अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या 'मिर्झापूर' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच तिची हाऊस अरेस्ट ही वेबसीरिज रिलीज झाली आहे. तसेच तिचा भांगडा पा ले हा चित्रपट रिलीज झाला आहे. आता ती लवकरच हाथी मेरे साथी चित्रपटात झळकणार आहे.

श्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो शेअर करत असते. तसेच ती तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. श्रियाने तिचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत श्रिया खूपच क्युट दिसतेय. सोशल मीडियावर तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. 

'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्कीच्या जागी श्रियाची वर्णी लागली आहे. या चित्रपटातून ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

श्रिया पिळगावकरने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, २०१९ वर्षाची सुरूवात खूप चांगली झाली असून मी हाथी मेरे साथी चित्रपटात राणा दुग्गाबतीसोबत दिसणार आहे. या चित्रपटात काम करायला मजा येणार आहे आणि या चित्रपटाचा विषय खूप चांगला आहे. माझ्यासाठी हा चित्रपट खूप खास असून पहिल्यांदाच मी त्रिभाषिक चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटातून तमीळ व तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Did you see shriya pilgaonkar childhood photo gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.