Did you see the photograph of Adinath Kothare and Urmila Kothare's daughter? | ​​आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का?

​​आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का?

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात जानेवारीला नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने कोठारे कुटुंब प्रचंड खूश झाले आहेत. सध्या त्यांचा सगळा वेळ हा या चिमुकलीच्या अवतीभवतीच जात आहे. तिच्या स्वागताची त्यांनी जोरदार तयारी केली होती. उर्मिलाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्या चिमुकलीचा पहिला फोटो नुकताच पोस्ट केला आहे. या फोटोत उर्मिलाने या चिमुकलीला उचलून घेतले आहे. पण आपल्याला केवळ त्यांच्या मुलीची एक झलकच या फोटोत पाहायला मिळत आहे. आदिनाथ आणि उर्मिलाच्या चिमुकलीचा चेहरा या फोटोत दिसत नसल्याने ते दोघे त्यांच्या चिमुकलीचा फोटो कधी पोस्ट करणार याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना लागली आहे.  
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. तसेच अनेक समारंभ, पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र पाहिले जाते. आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांना त्यांची जोडी खूपच आवडते. उर्मिला आणि आदिनाथ यांची लव्ह स्टोरी देखील खूप इंटरेस्टिंग आहे. शुभ मंगल सावधान हा उर्मिलाला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील महेश कोठारे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांना तो या चित्रपटासाठी असिस्ट करत होता. या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी आली असता आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले होते आणि तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. पुण्यातील लॉ कॉलेज जवळील एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते. अनेक वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११मध्ये लग्न केले.

urmila kothare baby image

Also Read : आदिनाथ कोठारे करणार माधुरी दीक्षितसोबत काम

Web Title: Did you see the photograph of Adinath Kothare and Urmila Kothare's daughter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.