'झपाटलेला' सिनेमात पूजा पवार या अभिनेत्रीने लक्ष्मीकांत बेर्डेची प्रेयसी बनत अक्षरशः धुमाकुळ घातला होता. या सिनेमातील तिची भूमिका लक्षवेधी ठरली. आजही सिनेमातील कलाकारांना रसिक विसलेले नाहीत. जेव्हा जेव्हा झपाटलेला सिनेमा आठवतो सगळ्या कलाकारांच्या भूमिका नजरे समोर नाही आल्या तर नवलच. 


विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि पूजा पवार हि मराठी सिनेसृष्टीतील एक अजरामर जोडी मानली जाते.  झपाटलेला, माझा छकुला, विदूषक, चिकट नवरा, उतावळा नवरा यासारख्या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांची कधी पत्नी तर कधी प्रेयसीच्या भूमिकेत आपण तिला पाहिले आहे. 
पूजा पवार इतक्या वर्षांनी पुन्हा चर्चेत येण्यास कारणीभूत ठरले आहेत तिचे हे खास फोटो. पुजाचे फोटो पाहून तुम्हाला झपाटलेला सिनेमातील तिचा ऑनस्क्रीन लुक नक्कीच आठवेल. सिनेमात अगदी देसी अंदाजात दिसलेली पूजा ख-या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.  ऑनस्क्रीन लूक प्रमाणे ऑफस्क्रीन ती सुंदर दिसते. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


तसेच पूजाची मुलगी आलिशा साळुंखेनेही अभिनयात पदार्पण केले आहे. अनेक जाहिरातींमध्ये आलिशा सध्या झळकत आहे. आलिशाला पाहताच तिच्यात पूजाची झलक पाहायला मिळते.

तसेच आलिशाला सिनेमातून नाहीतर नाटकातून आपल्या करिअरची सुरुवात करायची आहे.  तिने मॉडेलिंग हे केले आहे. त्यामुळे इतर स्टार किड प्रमाणे आलिशाही इंडस्ट्रीत तिचे स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Did you know this actress who Was Onscreen Wife of Laxmikant Berde in the movie Zapatlela ? Looks like now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.