'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा आहे साऊथमध्ये चांगलाच बोलबाल, ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 07:00 AM2021-02-25T07:00:00+5:302021-02-25T07:00:02+5:30

'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले.

Deepti sati shares her stunning photoshoot on internet | 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा आहे साऊथमध्ये चांगलाच बोलबाल, ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंमुळे असते चर्चेत

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा आहे साऊथमध्ये चांगलाच बोलबाल, ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंमुळे असते चर्चेत

googlenewsNext

अभिनेत्री दीप्ती सती सोशल मीडियावर सक्रीय असून तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिचा हा अंदाज तिच्या फॅन्सनादेखीस चांगलाच भावतो. यावेळी मात्र दीप्तीने तिचे ट्रेडिशनल लूकमधील फोटोशूट शेअर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दीप्तीने व्हाईट रंगाच्या ड्रेसमधले फोटोशूट शेअर केलं आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसते आहे. फोटोतील तिच्या अदा पाहून चाहते घायळ झाले आहेत, त्यांनी  या फोटांवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.


अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली.

इतकेच नाही तर ती या चित्रपटात बिकनीमध्ये देखील दिसली. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. या सिनेमासाठी दीप्तीची निवड 96 मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती. मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे.

Web Title: Deepti sati shares her stunning photoshoot on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.