De Dhakka fame Actress look like this after 12 years | ‘दे धक्का’मधील ‘उगवली शुक्राची चांदणी’ गाण्यात थिरकणारी बालकलाकार १२ वर्षांनंतर दिसते अशी !
‘दे धक्का’मधील ‘उगवली शुक्राची चांदणी’ गाण्यात थिरकणारी बालकलाकार १२ वर्षांनंतर दिसते अशी !

रुपेरी पडद्यावर २००८ साली सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे 'दे धक्का'. हा चित्रपट रसिकांना भावला आणि चित्रपटातील कलाकारांना तसंच त्यांच्या भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. सिद्धार्थ जाधवचा अतरंगी अंदाज आणि त्याला मकरंद अनासपुरेचा गावरान बाज रसिकांना भावला. शिवाय शिवाजी  साटम, मेधा मांजरेकर यांच्याही या चित्रपटात भूमिका होत्या.

 

'दे धक्का' या चित्रपटात दोन बालकलाकरांनी त्यांच्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती. ते बालकलाकार म्हणजे सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य. मात्र आता हे बालकलाकार मोठे झालेत आणि त्यामुळे त्यांचा लूकही. गौरीने दे धक्का चित्रपटात सायली ही भूमिका साकारली होती. 

'दे धक्का' चित्रपटाची कथा जिच्या डान्स स्पर्धेभोवती फिरत होती ती भूमिका गौरीने साकारली. तिच्यावर चित्रीत झालेलं ''उगवली शुक्राची चांदणी'' हे गाणं हिट ठरलं होतं. या चित्रपटातील याच गाण्यामुळे गौरीला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली. मात्र आता हीच गौरी करते काय?, ती कशी दिसते असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तिचा लूक पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही. 


गौरी आता २४ वर्षांची झाली आहे. तिने मुंबईत माटुंगा इथल्या ‘डी. जी. रुपारेल’ महाविद्यालयामधून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी’मधून पदवी घेतलीय. आपलं शिक्षण पूर्ण करत असताना ती अभिनयापासून दूर गेली. तिचा कोणताही नवा चित्रपट आलेला नाही. मात्र ती लवकरच रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण 'दे धक्का' चित्रपटाचा सिक्वेल रसिकांच्या भेटीला येतोय. यांत गौरीची भूमिका असण्याची शक्यता आहे. 


'दे धक्का' चित्रपटानंतर गौरीने 'शिक्षणाचा आयचो घो' या चित्रपटातही सक्षमच्या बहिणीची भूमिका साकारली. २०११ मध्ये ‘एकापेक्षा एक जोडीचा मामला’ ह्या रियालिटी शोमध्ये तिने सक्षमसोबत सहभाग घेतला होता. २०१५ साली तिने आवाहन चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २००७ साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. यांत तिने रूपा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. तिच्यासोबत सचिन खेडेकर, मनोज जोशी, कश्मीरा शाह, अमृता खानविलकर, सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यामुळे आता पुन्हा गौरी चित्रपटात झळकणार का याची उत्सुकता आहे. 


Web Title: De Dhakka fame Actress look like this after 12 years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.