कोरोना व्हायरसचा वाढता धोका बघता, संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमध्ये अख्खा देश जणू ठप्प झाला आहे. लोक आपआपल्या घरात कैद आहेत. सगळेच कलाकार आपापल्या घरात बंद आहेत. त्यामुळे प्रत्येकजण सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत आणि आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत.  तर काही जण आपल्यातील माहित नसलेले टॅलेंट समोर आणताना दिसत आहे. आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगने चक्क कोरोनावर रॅप साँग केले आहे. हे रॅप साँग त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमधून अभिनेता पुष्कर जोग घराघरात पोहचला. क्वारंटाईनमुळे घरात अडकलेल्या पुष्करने नुकतेच कोरोनावर एक रॅप साँग केले आहे. हे रॅप सॉंग त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. त्याच्या या रॅपला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या रॅपमध्ये कोरोनामुळे काय समस्या येत आहेत, हे सांगताना दिसतो आहे.पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनचा उपविजेता होता.

तसेच शेवटचा तो ती अँड ती चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाली कुलकर्णी व प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत होती.

आता त्याचा वेलडन बेबी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: CoronaVirus: Pushkar Jog's Corona rap song, fans get favors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.