दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या स्मिता गोंदकरचा ग्लॅमरस अंदाज नेहमीच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत असतो. आता पुन्हा एकदा आपला नवा अंदाज या एका फोटोमुळे समोर आला आहे. अर्थात हा नोमेकअप लूक असूनही तिच्या या अंदाजाला रसिकांची चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सा-यांना घरातच राहण्याची सरकारने आदेश दिले आहेत. अशात नेहमी बिझी असणारे सेलिब्रेटीही बंदिस्त घरात त्यांच्या घरातील काम करताना दिसत आहे. पहिल्यांदाच अनेक सेलिब्रेटींचे रिअल लूकही जगासमोर आले आहेत. त्यामुळे अनेकांनी सेलिब्रेटी नेहमी मेकअपमध्ये वेगळेच दिसत असल्यामुळे अनेकजण मोठ्या उत्साहाने त्यांचे नोमेकअप लूक पाहत त्यांना भरपूर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षावही करत असल्याचे पाहायला मिळते. अशातच स्मिताचाही या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

'पप्पी दे पारुला' म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत स्मिताने सा-यांची मनं जिकंली आहेत. स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Effect On Marathi Actress No Make up Look will Amaze You -SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.