Corona Effect : Dhanashri kadgaonkar doing cooking in quarantine period gda | Corona Effect : क्वारंटाईनचा असा फायदा करुन घेतायेत राणादाच्या 'वहिनी साहेब', पाहा हा व्हिडीओ

Corona Effect : क्वारंटाईनचा असा फायदा करुन घेतायेत राणादाच्या 'वहिनी साहेब', पाहा हा व्हिडीओ

कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व लोक घरात बंद आहेत. लोक आपल्या बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळत आहेत. ते स्वतःला स्वतःच्या घरात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत.अशातच आता दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त पेशंटची संख्या वाढत असताना अनेक धक्कादायक बाबीही या आजाराबाबत समोर येत आहेत. सध्या सर्वत्रच लॉकडाऊन आहे त्यामुळे मराठी सेलिब्रेटींनीही स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे.

'तुझ्यात जीव रंगला' मधील वहिनीसाहेब या भूमिकेमुळं धनश्रीचा प्रचंड मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.  धनश्रीने स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. यावेळेत ती स्वत:ताचे लाड करतेय असे तिने सांगितले आहे. तसेच ती रोज एक्ससाईज करतेय जेवण करतेय, घरातल्या व्यक्तिंसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर सुद्धा किचनमधला व्हिडीओ शेअर केला आहे. धनश्रीच्या व्हिडीओ चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिसाद केला. 

मालिकेतील  तिची निगेटीव्ह भूमिकेला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता.भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. धनश्री काडगांवकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट देत असते. ऑनस्क्रीन तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. सध्या वहिनी साहेब घरातले व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतायेत. 

View this post on Instagram

don't miss exercise...

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri) on

Web Title: Corona Effect : Dhanashri kadgaonkar doing cooking in quarantine period gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.