अभिनेता चिराग पाटील कायमच आपले कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी चिरागने आपल्या लेक रायनासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत रायना एका गाडीच्या जवळ उभी आहे. चिराग नेहमीच मुलीसोबतचे फोटो शेअर करत असतोय. बाप-लेकीचं प्रेमळ नातं नेहमीच आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतं.   


आपल्या अभिनयाने चिरागने रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. 'वजनदार', 'राडा रॉक्स', 'असेही एकदा व्हावे' अशा विविध चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय 'चार्जशीट', 'ले गया सद्दाम' अशा हिंदी चित्रपटातही त्याच्या अभिनयाची जादू दिसली आहे.  


लवकरच चिराग कबीर खान दिग्दर्शित आणि रणवीर सिंह स्टारर '८३' या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात चिराग आपल्या वडिलांची म्हणजेच संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे.दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून एका-एका क्रिकेटरच्या व्यक्तिरेखेवरुन पडदा उचलण्यात येतो आहे. माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे. तर साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. 


'८३' हा सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंगने फारच कमी कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये अभिनयाची जोरदार बॅटिंग केली असून आता '८३' सिनेमामध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

 

 

Web Title: Chirag patil share his daughter photo on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.