Chinmay Mandlekar and Santosh Juvekar share friendship with Tutai, shared a photo of the memories | चिन्मय मांडलेकर आणि संतोष जुवेकरची दोस्ती तुटायची नाय,शेअर केला आठवणीतला फोटो

चिन्मय मांडलेकर आणि संतोष जुवेकरची दोस्ती तुटायची नाय,शेअर केला आठवणीतला फोटो

छोटा पडदा, रुपेरी पडदा आणि रंगभूमी गाजवणारा अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. आपल्या अभिनयाने चिन्मयने ही तिन्ही माध्यमं गाजवली आहेत. चिन्मय सोशल मीडियावरही बराच सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याच्या फॅन्सशी संवाद साधत असतो. स्वतःचे फोटो आणि आठवणीसुद्धा तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत शेअर करतो. नुकतंच त्यानं शेअर केलेला एक आठवणीतला फोटो त्याच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये चिन्मयसह अभिनेता संतोष जुवेकर पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून तुम्हीही काही क्षण दोघांना ओळखू शकणार नाही. या फोटोत चिन्मय आणि संतोषची घट्ट मैत्री असल्याचे पाहायला मिळत आहे.

दोघं व्यायाम करत असताना काढलेला हा फोटो आहे. यांत दोघंही आपली शरीरयष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा फोटो शेअर करताना चिन्मय जुन्या आठवणीत रमल्याचे पाहायला मिळत आहे. संजित चांदोरकर या आपल्या ट्रेनरने हा फोटो काढल्याचे चिन्मयने नमूद केले आहे. शुटिंग दरम्यान वर्कआऊट करताना हा फोटो क्लिक केल्याची आठवण चिन्मयने सांगितली आहे. संतोष जुवेकर आणि चिन्मय मांडलेकर दोघांमध्ये चांगले बाँडिंग असून दोघे मोरया आणि झेंडा या सिनेमात एकत्र झळकले. या सिनेमांमुळे त्यांच्यातील मैत्री आणखीच घनिष्ट झाली. संतोष मला माझ्या भावासारखा आहे, असे चिन्मय सांगतो.
 

Web Title: Chinmay Mandlekar and Santosh Juvekar share friendship with Tutai, shared a photo of the memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.