सुयश टिळकच्या लग्नाला यायचं हं ! सुरु झाली लगीनघाई, पार पडला हळदी समारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 08:31 PM2021-10-19T20:31:16+5:302021-10-19T20:32:41+5:30

आयुशी भावेसुद्धा सुयशप्रमाणेच अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. अभिनेत्री आणि डान्सर म्हणून तिची ओळख आहे.

Check hows wedding preparations going on in Suyash Tilaks home, done with Haldi Ceremony | सुयश टिळकच्या लग्नाला यायचं हं ! सुरु झाली लगीनघाई, पार पडला हळदी समारंभ

सुयश टिळकच्या लग्नाला यायचं हं ! सुरु झाली लगीनघाई, पार पडला हळदी समारंभ

Next

लग्न घटिका समीप आली, करा हो लगीनघाई म्हणत अभिनेता सुयश टिळकचे आयुषी भावेसह लग्नासाठी काऊंटडाऊन  सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.लग्नापूर्वी पार पडलेल्या कार्यक्रमांनाही सुरुवात झाली आहे. नुकताच दोघांचा हळदी समारंभ पार पडला आहे. हळदी समारंभाचे काही फोटो समोर आले आहेत.  सुयश आणि आयुषीच्या हळदी समारंभाला मोजकेच पाहुणे मंडळी उपस्थित होते. चाहते या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हळदी समारंभ पार पडल्यानंतर दोघांच्या लग्नाची तारिख कोणती यावर आता चर्चा सुरु आहेत. दोघांनी लग्नाची तारिख जाहीर केली नव्हती. हळदी समारंभ पार पडल्यामुळे येत्या २१ किंवा २२ तारखेदरम्यान दोघांचा लग्नसोहळा पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. 

साखरपुडा झाल्याची बातमीही सुयशने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर केली होती. या खास क्षणाचे फोटो शेअर करत सुयशने चाहत्यांनाही सुखद धक्काच दिला होता. मध्यंतरी त्यांच्या केळवणाचे फोटो समोर आले होते. त्यानंतर आता थेट हळदी समारंभाचे फोटो समोर आले आहेत. 

सुयशने त्याच्या लग्नाचा मुहुर्ताविषयी सांगितले होते. दिलेल्या एका मुलाखतीत त्याने वर्षअखेरीस लग्न करणार असल्याचे सांगितले होते. करोनामुळे अनेक निर्बंध आहेत. सगळंकाही सुरळीत होण्याची वाट पाहतोय, लग्नाचा मुहूर्त अजुन ठरला नाहीय. तरीही याचवर्षी डिसेंबरपर्यंत आम्ही लग्न करायचं, असं ठरवल्याचे सुयशने चाहत्यांना सांगितले होते.


आयुशी भावेसुद्धा सुयशप्रमाणेच अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. अभिनेत्री आणि डान्सर म्हणून तिची ओळख आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुशी झळकली होती. आयुषी इन्स्टाग्रामच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.

Web Title: Check hows wedding preparations going on in Suyash Tilaks home, done with Haldi Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app