Celebrity couple Alok Rajwade and Parna Pethe beat Kelly Corona, shared experience | आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे या सेलिब्रेटी जोडप्याने केली कोरोनावर मात, शेअर केला अनुभव

आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे या सेलिब्रेटी जोडप्याने केली कोरोनावर मात, शेअर केला अनुभव

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यात भारतातही कोरोना व्हायरसचे संकट अद्याप कायम आहे. कोरोनाच्या जाळ्यात सेलिब्रेटीही अडकले आहेत. त्यात आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडप्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. हे सेलिब्रेटी कपल म्हणजे अभिनेता आलोक राजवाडे आणि अभिनेत्री पर्ण पेठे. काही दिवसांपूर्वी अभिनेता आलोक राजवाडेला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. तापामुळे तो हैराण झाला होता आणि त्याच्या तोंडाची चव गेली होती. त्याने लगेचच कोरोनाची टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. आलोकची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची पत्नी पर्ण पेठेनेही कोरोनाची चाचणी करुन घेतली. तिचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हे दोघेही नुकतेच कोरोना मुक्त झाले आहेत.

पर्ण पेठेने कोरोनाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. आलोक आणि पर्ण या दोघांनाही होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कोरोनाचा अनुभव सांगताना आलोक म्हणाला, आम्ही काहीही खाल्ले तरीही आमच्या तोंडाला चव येत नव्हती. कागद खाल्यासारखे भास होत होता. कोरोना झाला असताना आम्हाला वासही येत नव्हते.


मात्र आता पर्ण आणि आलोक आता पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतरही पर्ण आणि आलोक काही वेळ होम क्वारंटाईन राहिले होते. कोरोनातून बरे वाटल्यानंतर जेव्हा आमची वास घेण्याची क्षमता परत आली तेव्हा कुठे आम्हाला बरे वाटले, आमच्या मित्रांपैकी ज्यांना कोरोना झाला होता त्यांचेही अनुभव आम्ही ऐकत होतो. पण जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हाच आपल्याला त्या रोगाची तीव्रता समजते. असा अनुभव आलोकने शेअर केला.


पर्णने तिच्या चाहत्यांना सल्लादेखील दिला आहे. तिने म्हटले की, कोरोनामुक्त झाल्यानंतर आता दोघेही प्लाझ्मा डोनेट करणार आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा. कोणत्याही वस्तूला स्पर्श करताना सॅनिटायझर वापरा. कोरोनासारख्या रोगाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Celebrity couple Alok Rajwade and Parna Pethe beat Kelly Corona, shared experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.