अभिनेता आणि कॉमेडी किंग म्हणजे सिद्धार्थ जाधव. कॉमेडीच नाही तर आपल्या अभिनय कौशल्याने सिद्धार्थने रसिकांची मनं जिंकली आहे. आपल्या भूमिकांसोबतच सिद्धार्थ त्याच्या हटके स्टाईलमुळे रसिकांचं लक्ष वेधून घेतो. त्याची हटके आणि आकर्षक ड्रेसिंग स्टाईल कायमच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. 

शूटिंगवर जाणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहणं, दरवेळी सिद्धार्थ आपल्या हटके आणि आकर्षक ड्रेसिंगने रसिकांची मनं जिंकतो. त्यामुळेच की काय नुकतंच त्याचे सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतात.त्याच्या  लूक्स आणि स्टाइलबाबत तो फारच सजग बनला आहे.

रुपेरी पडदा, रंगभूमी आणि छोटा पडदा या तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सिद्धार्थने केवळ मराठीच नाही तर हिंदीतही अजय देवगण, रणवीर सिंहसारख्या बड्या स्टार्ससोबत रुपेरी पडदा गाजवला आहे. 

त्याचे करिअरच्या सुरूवातीचे फोटो आणि सध्याचे फोटो पाहिले तर कमालीचा बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. काळानुसार त्याने स्वतःला बदलत स्टायलिश पर्सनालिटी बनवली.

आजच्या या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब सिद्धार्थने लक्षात घेत त्यावर अभिनयाप्रमाणे मेकओव्हरला तितकेच महत्त्व दिले. त्यामुळेच दिवसेंदिवस सिद्धार्थ अधिक स्टायलिश होत गेला.

त्याची डॅशिंग स्टाईल स्टेटमेंट रसिकांच्याही पसंतीस पडते. त्याचे फोटो पाहताचफॅन्सकडून त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू असतो.


Web Title: Birthday Special: Siddhartha Jadhav, who used to look like this before, went viral on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.