भूषण प्रधान नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतो. आपल्या फॅन्सशी भूषण प्रधान कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतो. आपले आगामी सिनेमाचे फोटो, फिटनेसचे व्हिडिओ, हॉलिडेचे फोटो भूषण फॅन्ससाठी सोशल मीडियावर शेअर करत असतो.

त्यामुळे त्याला त्याचे फॅन्सदेखील मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात. नुकताच भूषणने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत भूषण खूपच हँडसम दिसतोय. भूषणाच्या फॅन्सना देखील त्याचा हा लूक आवडला आहे. 


'सतरंगी रे', 'मिस मॅच', 'टाईमपास', 'टाईमपास-2', 'कॉफी आणि बरंच काही' अशा विविध सिनेमांमध्ये भूषणनं भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या. पिंजरा या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

मराठीत मिळालेल्या यशानंतर भूषण प्रधान आता बॉलिवूडकडे वळला आहे.. या सिनेमात त्याच्या सोबत रायमा सेन दिसणार आहे. भुषण प्रधान पहिल्यांदाच रायमा सेनसोबत या चित्रपटाच्या निमित्ताने काम करतो आहे.या चित्रपटात भूषण व रायमा यांच्याव्यतिरिक्त अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब व तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Bhushan pradhan share his new photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.