'भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात राणा दग्गुबती नाही तर हा मराठी कलाकाराची वर्णी, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 07:15 AM2020-01-19T07:15:00+5:302020-01-19T07:15:00+5:30

'भूज द प्राइड ऑफ इंडिया' या आगामी सिनेमात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. शदर केळकर व्यतिरिक्त अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा आणि ऐमी विर्क ही दिग्गज कलाकार मंडळीही असणार आहेत.

Bhuj The Pride of India: Rana Daggubati Out, Sharad Kelkar In | 'भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात राणा दग्गुबती नाही तर हा मराठी कलाकाराची वर्णी, कोण आहे तो?

'भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात राणा दग्गुबती नाही तर हा मराठी कलाकाराची वर्णी, कोण आहे तो?

googlenewsNext

‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या सिनेमात शरद केळकरच्या भूमिकेला रसिकांनी भरघोस पसंती दिली. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शदर केळकर झळकला होता. आपल्या अभिनयाने या भूमिकेला योग्य न्याय देत समिक्षक आणि रसिकांकडून दाद मिळवली. शरदने आजवर अनेक हिंदी, मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे. आता पुन्हा एकदा दमदार भूमिकेत शरद केळकर झळकणार आहे.  'भूज द प्राइड ऑफ इंडिया' या आगामी सिनेमात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. शदर केळकर व्यतिरिक्त अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा  आणि ऐमी विर्क ही दिग्गज कलाकार मंडळीही असणार आहेत. शरद केळकरच्या भूमिकेसाठी आधी राणा दग्गुबतीला ऑफर मिळाली होती. मात्र राणाने त्याची प्रकृती ठिक नसल्यामुळे सिनेमातून माघार घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राणाच्या भूमिकेसाठी शरद केळकरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 


१९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धाची पार्श्वभूमी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. भारत पाक युद्धादरम्यान कर्णिक हे हवाई दलाच्या भूज तळावर नियुक्त होते. हवाई दलाच्या हल्ल्यात भूज तळावरील धावपट्टी उद्ध्वस्त झाली. त्यावेळी कर्णिक यांनी धाडसी निर्णय घेत आजूबाजूच्या गावातील ३०० महिलांकडे तळाची बांधणी करण्यासाठी मदत मागितली होती. त्यांचा हा धाडसी निर्णय आणि हवाई दलाची वाटचाल या सिनेमात पहायला मिळणार आहे.


आजवर साकारलेल्या भूमिकांमध्ये सिनेमा निवडताना शरद नेहमीच अभिनयालाच प्राधान्य देतो. त्यानुसार तो सिनेमाच्या ऑफर स्विकारत असल्याचे त्याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. 

Web Title: Bhuj The Pride of India: Rana Daggubati Out, Sharad Kelkar In

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.