Bhai Kadam and Nilesh Sawanee took the 'Kanha' chief ministers to take out the spin | ​भाऊ कदम व निलेश साबळेंनी ‘कान्हा’साठी मुख्यमंत्र्यांची घेतली फिरकी

​भाऊ कदम व निलेश साबळेंनी ‘कान्हा’साठी मुख्यमंत्र्यांची घेतली फिरकी

‘कान्हा’ चित्रपटातून दहीहंडीच्या विविध प्रश्नांचा उहापोह करण्यात येईल अशी अपेक्षा मला आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा आणि त्याला भरभरून यश मिळावे आणि या चित्रपटाने सर्व विक्रम मोडावे’ अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्याप्रसंगी कान्हा चित्रपटाला दिल्या. प्रताप सरनाईक यांचा आगामी ‘कान्हा’ या चित्रपटातून एक महत्त्वाचा सामाजिक विषय मांडत आहेत.
 
 
संगीत प्रकाशनाच्या या सोहळ्यात ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे निवेदक डॉ. निलेश साबळे आणि अभिनेते भाऊ कदम यांनी विनोदाचे रंग भरले. यावेळी या दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दहीहंडीच्या आठवणी जाणून घेत आपल्या खास शैलीत संवाद साधला. याशिवाय इतरही मान्यवरांकडून या आठवणी जाणून घेत एकच धम्माल उडवून दिली.

मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये रंगलेल्या या शानदार सोहळ्यात विविध पक्षांतील राजकीय नेत्यांसह उद्योग क्षेत्रातील आणि मराठी हिंदी मनोरंजन दुनियेतील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या विहंग एंटरटेन्मेटची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अवधूत गुप्ते यांचं आहे. चित्रपटात वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी आणि गौरी नलावडे हे कलाकार मुख्य भूमिकेत असून झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेला हा चित्रपट येत्या २६ आॅगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bhai Kadam and Nilesh Sawanee took the 'Kanha' chief ministers to take out the spin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.