bayko deta ka bayko actor and director beaten by mob | दिग्दर्शक आणि अभिनेत्याला चित्रपटगृहातच करण्यात आली बेदम मारहाण

दिग्दर्शक आणि अभिनेत्याला चित्रपटगृहातच करण्यात आली बेदम मारहाण

ठळक मुद्देबायको देता का बायको या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकावर अचानक चित्रपटगृहात काही तरुणांनी जीवघेणा हल्ला केला.

कोणत्याही दिग्दर्शकावर चित्रपटगृहात हल्ला व्हायची ही बहुधा पहिलीच वेळ असेल. बायको देता का बायको या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकावर अचानक चित्रपटगृहात काही तरुणांनी जीवघेणा हल्ला केला. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे सुरेश ठाणगे आणि दिग्दर्शक धनंजय यमपुरे बीड येथील आशा सिनेप्लेक्स थिएटरमध्ये प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहाण्यासाठी गेले असता ही घटना घडली.

चित्रपटगृहातच सुरेश आणि धनंजय यांना बेदम मारहाण करण्यात आली. ते दोघेही या मारहाणीत जबर जख्मी झाले आहेत. अभिनेत्री श्वेता कुलकर्णीने तिथून पळ काढल्यामुळे या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली. या तरुणांनी त्यांना मारहाण करण्यासोबतच सिनेमागृहाची देखील तोडफोड केली. अभिनेता आणि दिग्दर्शक यांना का मारहाण करण्यात आली याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीये.

‘लग्न’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. वयात आलेल्या प्रत्येक युवकाला आपलंही लवकर लग्न व्हावं, सुंदर आणि सुशील बायको मिळावी आणि आपली जोडी चारचौघांत उठून दिसावी अशी इच्छा असते. याच भावनेतून बायकोच्या शोधात निघालेल्या युवकांची कथा सांगणारा ‘बायको देता का बायको’ हा धमालपट असून तो नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

Web Title: bayko deta ka bayko actor and director beaten by mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.