अभिनेत्री अर्चना जोगळेकर नव्वदीचे दशक त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने गाजविले. त्यांनी मराठी सोबतच हिंदी, ओडिशा यांसारख्या भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यांना त्याकाळात चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले होते. त्यांच्या सौंदर्याची तर चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. यादरम्यानच 1997 साली एका विकृत माणसाने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.

 

30 नोव्हेंबर 1997 साली अर्चना जेव्हा ओडिसा येथे एका चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. त्यावेळी त्या पंथा निवास येथे राहत होत्या. तेव्हा रात्री तिथे भुबानानंदा पंडा हा इसम गेला आणि अर्चना यांचा ऑटोग्राफ घेण्याच्या बहाण्याने त्यांच्या खोलीत शिरुन त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. डिसेंबर 1997 रोजी त्या माणसाला पकडण्यात आले होते आणि एप्रिल 2010 साली त्याला 18 महिने कारावासाची शिक्षा भुवनेश्वर फास्ट ट्रॅक कोर्टाने सुनावली.


त्या एक खूप चांगल्या अभिनेत्री असण्यासोबतच खूपच चांगल्या डान्सर आहेत. त्या प्रसिद्ध कथ्थक डान्सर असून त्यांनी अनेक वर्षं नृत्याचे धडे गिरवले आहेत. अर्चना यांच्या नृत्य कौशल्याचे कौतुक नेहमीच केले जाते.अर्चना या लग्नानंतर विदेशात स्थायिक झाल्या आहेत. पण त्यांचे नृत्यप्रेमाने त्यांना तिथेही स्वस्थ बसू दिले नाही. अर्चना यांनी विदेशात म्हणजेच न्यू जर्सी येथे अर्चना नृत्यालय उघडले आहे आणि तिथे अनेक विद्यार्थ्यांना त्या कथ्थक नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देतात.

 

अर्चना यांची आई आशा जोगळेकर यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे धडे गिरवले. मोठ्या पडद्याप्रमाणेच छोट्या पडद्यावर देखील काम केले. चुनौती, फुलवती, कर्मभूमी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील त्या झळकल्या आहेत. 'मॅरिड टू अमेरिका' या २०१२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्या शेवटच्या झळकल्या होत्या. त्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत आपल्या कुटुंबियांसोबत राहात आहेत.

Web Title: Attempt of Rape on Marathi actress Archana Joglekar while shooting, know story behind this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.