ठळक मुद्देअस्तादने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अग्निहोत्र या मालिकेत काम केले होते. या मालिकेत अभिनेत्री प्राची मते त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेतील या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

मराठी बिग बॉसमधून अभिनेता अस्ताद काळेची लव्हस्टोरी जगासमोर आली. अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबतच्या रिलेशनशिपची कबुली त्याने बिग बॉस मराठीमध्ये दिली होती आणि आता ते दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या केळवणाचे फोटो नुकतेच सोशल मीडियाावर व्हायरल झाले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, अस्तादचे स्वप्नालीच्या आधी एका मुलीवर जीवापाड प्रेम होते. पण तिचे काही वर्षांपूर्वी एका आजाराने निधन झाले.

अस्तादने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अग्निहोत्र या मालिकेत काम केले होते. या मालिकेत अभिनेत्री प्राची मते त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेतील या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. खऱ्या आयुष्यातही त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच कल्पना होती. पण वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी प्राचीचे कॅन्सरने निधन झाले. प्राचीला बोनमॅरो कॅन्सर होता आणि तिचा आजार अंतिम टप्प्यात असताना त्याचे निदान झाले होते. प्राचीची तब्येत दिवसेंदिवस ढासाळायला लागली होती. त्यामुळे तिने मालिकांमध्ये काम करणे देखील सोडले होते. तिच्या शेवटच्या दिवसांत अस्ताद तिच्या सतत सोबत होता. तिचे निधन होऊन पाच वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे.

अनेक वर्षांपूर्वी एका मालिकेचा पायलट एपिसोड शूट करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात अस्ताद आणि स्वप्नाली दोघे भाऊ-बहीण होते. त्यानंतर जवळजवळ तीन-चार वर्षांनी दोघांनी पुढचे पाऊल या मालिकेत काम केले. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर या दोघांची मैत्री झाली आणि काहीच महिन्यात अस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला. अस्तादने स्वप्नालीला प्रपोज केले नाही. मात्र मनात काय हे बोललेच पाहिजे असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे स्वप्नालीला त्याने तू मला आवडतेस असे सांगितले. त्यावर या गोष्टीचा विचार करू दे असे उत्तर स्वप्नालीने त्याला दिलं आणि जवळजवळ वर्षभरानंतर होकार कळवला होता. त्यांच्या लग्नाबाबत त्यांच्या फॅन्सना आता उत्सुकता लागली आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: astad kale was in relationship with prachi mate before engaged to swapnali patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.