Anna Parat Alay Ye Re Ye Re Paisa 2 Marathi Movie Releasing On 9th August 2019 | आण्णा परत आलायचे गुढ आले समोर, तर 'हा' अभिनेता साकारणार अण्णाची भूमिका
आण्णा परत आलायचे गुढ आले समोर, तर 'हा' अभिनेता साकारणार अण्णाची भूमिका

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या 'अण्णा परत येतोय' या मीम्सचा आता उलगडा झाला आहे. हा आण्णा आहे "संजय नार्वेकर"."ये रे ये रे पैसा" या चित्रपटाच्या पहिल्या भागात आण्णा ही मध्यवर्ती भूमिका साकारलेल्या संजय नार्वेकरने धमाल उडवून दिली होती. साऊथ  आफ्रिकेत गेलेला अण्णा "ये रे ये रे पैसा २" मध्ये भारतात परत आला आहे.  "ये रे ये रे पैसा २" या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. धमाल अशा विनोदी मीम्समधून 'आण्णा परत येतोय' अशी वर्दी देण्यात आली होती. पण हा अण्णा कोण, त्याचे मीम्स, सेलिब्रेटिसचे व्हिडीओ का केले आहेत हे कळायला काही मार्ग नव्हता. त्यामुळे या अण्णा विषयी कुतूहल तयार झाले होते. अखेरीस अण्णा कोण या प्रश्नाचे उत्तर आता सापडले असून आता लवकरच "ये रे ये रे पैसा २" हा चित्रपट निखळ मनोरंजन करण्यासाठी ९ ऑगस्टला  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


ये रे ये रे पैसाच्या पहिल्या भागाची कथेमुळे रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला होता. पाच माणसांची आणि त्यांच्या सोबत घडणाऱ्या गमतीदार गैरसमज अशी सिनेमाची कथा होता. उमेश, तेजस्विनी, सिद्धार्थ, संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी म्हणजेच आदित्य, बबली, सनी, अण्णा आणि जान्हवी या पाच जणांच्या आयुष्यात घडणारी एक घटना त्यांना विचित्रप्रकारे एकमेकांसमोर आणते. आपापल्या आयुष्यात या ना त्या कारणाने पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागे पळत असताना होणाऱ्या भन्नाट गैरसमजांची आणि बनवाबनवीची कथेने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले होते.  आता  "ये रे ये रे पैसा २" ची कथा ही पहिल्या भागाप्रमाणे अतिशय रंजक असणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Web Title: Anna Parat Alay Ye Re Ye Re Paisa 2 Marathi Movie Releasing On 9th August 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.