आता लशीवर नवीन चित्रपट येतोय म्हणे...! अंकुश चौधरीची पोस्ट वाचून तुम्हीही म्हणाल ‘एक नंबर दिग्या’  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 02:37 PM2021-05-18T14:37:33+5:302021-05-18T14:38:50+5:30

Ankush Chaudhari : मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरीची एक पोस्ट सध्या जाम चर्चेत आहे. होय, त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय.

Ankush Chaudhari funny post on corona vaccination | आता लशीवर नवीन चित्रपट येतोय म्हणे...! अंकुश चौधरीची पोस्ट वाचून तुम्हीही म्हणाल ‘एक नंबर दिग्या’  

आता लशीवर नवीन चित्रपट येतोय म्हणे...! अंकुश चौधरीची पोस्ट वाचून तुम्हीही म्हणाल ‘एक नंबर दिग्या’  

Next
ठळक मुद्देअंकुश चौधरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटचा तो ‘धुरळा’ चित्रपटात झळकला होता.

मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) याची एक पोस्ट सध्या जाम चर्चेत आहे. होय, त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. अंकुशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. ती वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. (Ankush Chaudhari funny post)
पोस्टमध्ये काय तर अंकुशने भारतातील लसीकरणाच्या सद्यपरिस्थितीवर उपरोधिक ताशेरे ओढले आहेत. देशात लसींचा प्रचंड तुटवडा आहे. अनेक केंद्रांवर लसींसाठी रांगा लागल्या आहेत. 45 वर्षाच्या वरच्या लोकांना दुस-या डोजसाठी प्रतीक्षा करावी लागतेय. 18 ते 40 वयोगटातील लोकांच्या लसीचा तर पत्ताच नाही. याच पार्श्वभूमीवर अंकुशने जोरदार चिमटा काढला आहे.

‘आता लशीवर नवीन चित्रपट येतोय म्हणे...ती सध्या कुठे मिळते?,’ अशी ही पोस्ट आहे. त्याची ही पोस्ट चांगलीच लक्षवेधी ठरली आहे. साहजिकच त्याच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘ज्याचा आहे वशीला, त्यानेच जावे लशीला,’ अशी मजेदार प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. काहींनी एक नंबर, बरोबर, सही असे लिहित अंकुशच्या या पोस्टला दुजोरा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंकुश सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह झालेला दिसतोय. अगदी अलीकडे त्याने मास्क घालण्याचे आवाहन करणारी अशीच एक मजेदार पोस्ट शेअर केली होती.

‘ तेरी मेरी यारी , अगोदर मास्क घालू, मग करू दुनियादारी,’असे म्हणत त्याने चाहत्यांना मास्क घालण्याचे आवाहन केले होते.
अंकुश चौधरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटचा तो ‘धुरळा’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ हे कलाकार होते. त्यानंतर तो ‘लकडाऊन’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगदेखील पूर्ण झाले आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ankush Chaudhari funny post on corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app