... and Pooja Sawant pushed Aniket into water and pushed Puja Sawant | ​...आणि अनिकेत विश्वासरावला पाण्यात ढकलून पूजा सावंतने काढला पळ
​...आणि अनिकेत विश्वासरावला पाण्यात ढकलून पूजा सावंतने काढला पळ
आपल्या आवडत्या कलाकारांच्या खाजगी आयुष्यातील गुजगोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता अनेक चाहत्यांना असते. खास करून त्यांची आवडती डिश, फेव्हरेट कलर तसेच त्यांची प्रेम प्रकरणं अशा अनेक गोष्टीचा मागोवा ही चाहतेमंडळी घेत असतात. अशा या चाहत्यांसाठी एक गमतीदार बातमी आहे.
श्रेयश जाधव निर्मित आणि समीर हेमंत जोशी दिग्दर्शित बसस्टॉप सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक भन्नाट किस्सा आहे.  तो म्हणजे पूजा सावंतला पाण्याची फार भीती वाटते, त्यातही स्विमिंग पूल म्हटलं तर नको रे देवा अशी पूजाची अवस्था होते. मात्र सिनेमाच्या एका सीनसाठी पूजाला पाण्यात उडी मारावी लागणार होती. अनिकेत विश्वासरावला पाण्यात धक्का मारून स्वतः पाण्यात उडी तिला मारायची होती, त्यानुसार सगळे ठरले देखील. दिग्दर्शकांनी अॅक्शन म्हटले आणि पूजाने अनिकेतला पाण्यात ढकलले. मात्र स्वतः पाण्यात उडी मारायचे सोडून तिने चक्क पळच काढला.
पूजाच्या या कृतीमुळे टीममध्ये सर्वत्र हशा पिकला. मात्र रिटेकमध्ये पूजाने हिंमत करून सीन पूर्ण केला. अशी ही चित्रीकरणादरम्यान झालेली छोटीशी गंमत जरी असली तरी याहून अधिक भन्नाट गोष्टी चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. यात पूजा आणि अनिकेतबरोबरच अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे या कलाकारांची धमाल देखील पाहायला मिळणार आहे. पडद्यावरच्या या सर्व कलाकारांच्या गमतीजमती २१ जुलैला प्रेक्षकांना आपल्या नजीकच्या सिनेमागृहात पाहाता येणार आहेत.
बस स्टॉप या चित्रपटात आजचे आघाडीचे अनेक कलाकार असल्याने प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Also Read : तब्बल 35 लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेला 'बस स्टॉप'Web Title: ... and Pooja Sawant pushed Aniket into water and pushed Puja Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.