Ananya Marathi Movie shooting begins | 'अनन्या'सिनेमाचा मुहूर्त संपन्न, शूटिंगला सुरूवात
'अनन्या'सिनेमाचा मुहूर्त संपन्न, शूटिंगला सुरूवात

मराठी रंगभूमीवर गाजलेल्या अनन्या नाटकाचं कथानक आता मोठ्या पडद्यावर येत आहे. टीव्ही मालिकांतून आपल्या अभियनायाची छाप उमटवलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून ऋताचं रूपेरी पडद्यावर पदार्पणही होत आहे. प्रताप फड हे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला असून, चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. "अनन्या" या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. मात्र, वेगळ्या माध्यमात आणि वेगळ्या रूपात ही कथा येत आहे. 


एक आशयसंपन्न आणि प्रेरणादायी कथा या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.  ऋतासह या चित्रपटात आणखी कोण कलाकार झळकणार आहेत याबाबतची सर्व माहिती लवकरच समोर आली आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे बोलले जात आहे.

सिनेमाचं टीजर पोस्टर अतिशय लक्षवेधी आणि सूचक आहे. मोकळ्या आणि अथांग आकाशाकडे पाहात पक्षाप्रमाणे झेप घेऊ पाहाणारी तरुणी या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे स्त्री केंद्रित, प्रेरणादायी आणि आशयसंपन्न कथानक या सिनेमातून मांडलं जाणार असल्यानं हा सिनेमा नक्कीच महत्त्वाचा ठरेल यात शंका नाही.

Web Title: Ananya Marathi Movie shooting begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.