ठळक मुद्देनुकतेच अमृताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच स्टनिंग आणि हॉट दिसतेय. अमृताच्या फॅन्सनी तिच्या या फोटो शूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

मराठी सिनेमांसह अमृताने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. 'राजी', 'सत्यमेव जयते' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. अमृता खानविलकर आता मलंग या बहुचर्चित सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा आहे. 

अमृता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असते. तिने पोस्ट केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

मराठी सिनेसृष्टीत पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. मराठी अभिनेत्रींच्या करिअरच्या सुरुवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. याच यादीत सगळ्यात जास्त ग्लॅमरस मराठमोळी अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जात आहे.

नुकतेच अमृताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच स्टनिंग आणि हॉट दिसतेय. अमृताच्या फॅन्सनी तिच्या या फोटो शूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या फोटोतील तिच्या सेक्सी अंदावर तिचे फॅन्स फिदा झाले आहेत. 

Web Title: Amruta Khanvilkar shares her hot and sexy pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.