Amruta khanvilkar share her mom's reaction while her stunt going on air | अमृता खानविलकरचा स्टंट पाहून आईने दिली अशी रिअ‍ॅक्शन, Video पाहून तुमच्याही उंचावतील भुवया

अमृता खानविलकरचा स्टंट पाहून आईने दिली अशी रिअ‍ॅक्शन, Video पाहून तुमच्याही उंचावतील भुवया

  मराठी सिनेमांसह अमृताने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. 'राझी', 'सत्यमेव जयते' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. अमृता खानविलकर आता मलंग या बहुचर्चित सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा आहे. अमृता सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडीओमुळे सध्या चर्चेत आली आहे. मात्र या व्हिडीओत अमृता दिसत नसून तिच्या आई आहे. 


'खतरों के खिलाडी 10'मध्ये अमृताने सहभाग घेतला आहे. गेल्या आठवड्या सुरु झालेल्या या शोमध्ये अमृता खतरनाक स्टंट केला. या स्टंट टीव्हीवर पाहताना अमृताने तिच्या आईचे हावभाव कॅमेऱ्यात कैद करुन आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हा एपिसोड पाहताना अमृताच्या आई अव्वाक झाल्या होत्या. लेकीने केलेला स्टंट पाहून त्यांनी डोक्याला हात लावला. अमृताने स्वत:चा हा व्हिडीओ शूट केला आहे. 


अमृतासोबतच कोरिओग्राफर धर्मेश, आरजे मलिष्का, अभिनेत्री अदा खान, तेजस्विनी प्रकाश, करिश्मा तन्ना, ये है मोहब्बतें फेम करण पटेल, कॉमेडियन बलराज सयाल, शिवीन नारंग, भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीसुद्धा या शोमध्ये स्टंट करताना दिसतायेत. रिपोर्टनुसार अमृताला या शोमध्ये भाग होण्यासाठी एका भागाचे दीड लाख रुपये इतके मानधन देण्यात आले आहे.

Web Title: Amruta khanvilkar share her mom's reaction while her stunt going on air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.