Amruta khanvilkar looks stunning in her new photoshoot | अमृता खानविलकरने शेअर केलं ग्लॅमरस फोटो, चाहतेच काय सेलिब्रेटीही झाले फिदा

अमृता खानविलकरने शेअर केलं ग्लॅमरस फोटो, चाहतेच काय सेलिब्रेटीही झाले फिदा

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृताने अलिकडेच  इंस्टाग्रामवर  तिचं ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.तिचे हे फोटोशूट पाहून चाहते थक्क झाले आहेत. फोटोतील अमृताच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. फोटोतील अमृताचं हास्य तिच्या सौंदर्याला चार चाँद लावते आहे. चाहत्यांसह सेलिब्रेटीही तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करतायेत. काही वेळातच तिचं हे फोटोशूट व्हायरल झाले आहे..

अमृता आज  मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.  मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहिली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Amruta khanvilkar looks stunning in her new photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.