हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ही ती अपलोड करत असून रसिकांची प्रशंसा मिळवताना दिसते. सध्या अमृता लंडनमध्ये शूटिंग करतेय. इन्स्टाग्राम अमृताने लंडनमधील फोटो शेअर करत ही माहिती दिलीय. अमृता पुष्कर जोगसोबत वेलडन बेबी या सिनेमाचे शूटिंग करते आहे.  


मालिका, डान्स रिअॅलिटी शोसह हिंदी आणि मराठी सिनेमातही अमृताने काम केले आहे. गोलमाल, साडेमाडे तीन, नटरंग, झकास, धुसर, फक्त लढ म्हणा, सतरंगी रे, बाजी अशा मराठी सिनेमात अमृताने काम केले आहे. शिवाय बॉलीवुडमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली.

आपल्या अभिनयासह नृत्याने अमृताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. उत्तम डान्सर असलेल्या अमृताच्या नृत्यावर रसिक फिदा आहेत. अमृताने डान्स रिअॅलिटी शोमध्येही आपल्या नृत्याची जादू दाखवली आहे. 


लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे.  अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
 

Web Title: Amruta khanvilkar doing shooting in london

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.