हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. 

अमृता आता लवकरच एका नवीन प्लॅनेटवर दिसणार आहे. नवीन प्लॅनेट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडणं अगदी साहजिक आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, “एण्टरटेन्मेंट इंडस्ट्रीत अमृता स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या मार्गावर आहे. प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांच्या सहयोगाने अमृता मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्लॅन्स तयार करत आहे.”

प्लॅनेट मराठीचा इव्हेंट नुकताच पार पडला. यावेळी अमृताने परिधान केलेल्या जम्पसुटमधील लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत.  मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं.

याशिवाय हिंदी सिनेमातही अमृताने आपल्या अभिनयाने छाप पाडली. राजी, सत्यमेव जयते अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. मराठीत अमृताने अर्जुन, कट्यार काळजात घुसली, वेलकम जिंदगी, आयना का बायना अशा विविध सिनेमात काम केले आहे.


लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल. कारण यात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: Amrita Khanvilkar's photoshoot in jumpsuit, looks glamorous and bold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.