चॅकलेट बॉय अभिनेता अमेय वाघ अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. अमेयने आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी सिनेमा, मालिका, रंगभूमी, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. अमेय सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असतो. फोटो, व्हिडीओ आणि आपल्या आगामी सिनेमाची माहिती तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सना तो देत असतो.

अशी सुरु झाली अमेय-साजिरीची लव्हस्टोरी
अमेय वाघ 2017 साली विवाह बंधनात अडकला. 13 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर त्याने साजिरी देशपांडेशी लग्नाचा निर्णय घेतला. अमेय आणि साजिरीची लव्हस्टोरी पुण्याच्या कॉलेजमध्ये सुरु झाली. साजिरी अमेयच्या कॉलेजमधील नाटकाची तालीम पाहायला यायची.

अमेयला पाहिल्यानंतर साजिरी त्याच्या प्रेमात पडली आणि इथून त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. अमेयची पत्नी साजिरी दिसायला खूपच सुंदर आहे. अमेय तिच्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.. 

दिल दोस्ती दुनियादारी ही अमेयची मालिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच मुरांबा, फास्टर फेणे, धुराळा यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. लवकरच अमेय 'झोंबिवली' सिनेमात दिसणार आहे.  आदित्य सरपोतदार या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. 2021ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Amey wagh's wife look beautiful, see pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.