'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून रसिकांच्या मनात आपलं घर निर्माण करणारा अभिनेता अमेय वाघ याच्या लग्नाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने 2 जुलै, 2017 साली त्याची बालमैत्रिण साजिरी देशपांडेसोबत विवाहबंधनात अडकला होता. त्याच्या लग्नाला दोन वर्षे झाल्याचे त्यानेच सोशल मीडियावर साजिरीसोबतचा फोटो शेअर करून सांगितलं आहे.


अमेय वाघ लवकरच 'गर्लफ्रेंड' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अमेय सोशल मीडियावर सक्रीय असून त्याने त्याची पत्नी साजिरीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत आज त्याच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाल्याचे त्याच्या चाहत्यांना सांगितलं. त्याने फोटो शेअर करत लिहिलं की, ''गर्लफ्रेंडचं' जोरात प्रमोशन पण बायकोपाशी हळूवार इमोशन! आज लग्न करून २ वर्षं झाली ! मला सहन करायची तिची ताकद आज दुप्पट वाढली !! '

गेल्या 13 वर्षांपासून असलेली बालमैत्रिणी साजिरी देशपांडेशी अमेयनं लग्न केलं. साजिरी माझी खूप चांगली मैत्रीण असून, गेल्या 13 वर्षांपासून ती हे नाते चांगल्या पद्धतीनं हाताळते आहे. म्हणूनच मी तिच्याशी लग्न करणार असल्याचं अमेयनं सांगितलं होतं. 

'गर्लफ्रेंड' या चित्रपटाचे दिग्दर्शन उपेंद्र सिंधये यांनी केलं असून त्यांनीच या चित्रपटाचे लेखनही केले आहे.

तर चित्रपटाची निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटीस, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवाला करणार आहे.

हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: Amey Wagh's marriage completed 2 years, he wrote emotional post for wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.