Amey Wagh will be seen in Hindi Web Series | अमेय वाघ झळकणार हिंदी वेबसीरिजमध्ये
अमेय वाघ झळकणार हिंदी वेबसीरिजमध्ये

ठळक मुद्देअमेय वाघ पहिल्यांदाच दिसणार अर्शद वारसीसोबतअमेय वाघ हिंदी वेबसीरिजबाबत उत्सुक

अभिनेता अमेय वाघने नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांची मने जिंकली आहेत. आता तो लवकरच हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. 

अभिनेता अमेय वाघ आपल्या चाहत्यांना एका मागून एक आश्चर्याचे धक्के देत आहे. काही दिवसांपूर्वी अमेयने सोशल नेटवर्किंग साईटद्वारे, लवकरच निगेटिव्ह भूमिकेतून झळकणार असल्याची माहिती दिली होती. या बातमीची चर्चा होत असतानाच, त्याने आणखीन एका नव्या प्रोजेक्टबद्दल सांगत त्याच्या चाहत्यांना खुश करून टाकले आहे. ती बातमी म्हणजे, अमेय लवकरच एका  हिंदी वेबसीरिजमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. डिंग इंटरटेंटमेंट निर्मित आणि अनिरुद्ध सेन दिग्दर्शित 'असुरा' असे त्याचे नाव असून, वूट ऍपवर प्रदर्शित होणारी ही एक थ्रिलर गोष्ट आहे. विशेष म्हणजे, अमेयची यात महत्वपूर्ण भूमिका असून, तो पहिल्यांदाच अशा थ्रिलर वेबसिरीजमध्ये काम करताना दिसून येणार आहे. 
हिंदीच्या नावाजलेल्या कलाकारांचा समावेश असलेल्या या वेबसिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीची प्रमुख भूमिका आहे. 'असुरा' या वेबसिरीजच्या निमित्ताने अर्शदसोबत काम करण्याची संधी अमेयला मिळणार असल्यामुळे तो देखील खूप उत्सुक आहे. इतकेच नव्हे तर, नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेल्या या वेबसीरिजनंतर, अमेयकडे त्याच्या चाहत्यांसाठी आणखीन एक मोठे सरप्राईज आहे ! मात्र ते काय आहे, हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Web Title: Amey Wagh will be seen in Hindi Web Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.