Akshaya deodhar fan of game of thrones | पाठकबाईंचा जीव राणादामध्ये नाही तर यात रंगला
पाठकबाईंचा जीव राणादामध्ये नाही तर यात रंगला

ठळक मुद्देअक्षयचा जीव सध्या रंगलाय तो 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर हे नाव घराघरात पोहोचले. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. पाठकबाई या भूमिकेमुळे अक्षया देवधर हे नाव प्रकाश झोतात आसे मात्र तुम्हाला हे माहिती आहे का, की तुमच्या लाडक्या पाठकबाई 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या फॅन आहेत.

अक्षयचा जीव सध्या रंगलाय तो 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये. चित्रीकरणातून थोडा वेळ काढत अक्षया सध्या त्याचे एपिसोड्स पाहतेय. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिनं नुकतीच याबद्दलची एक पोस्ट केली होती. प्रत्येक आठवड्यात आता पाठक बाई गेम ऑफ थ्रोन्सचा नवीन भाग पाहण्यासाठी नियमितपणे वेळ काढतील हे मात्र नक्की.

नुकताच या मालिकेने ७५० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत आणि त्या तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजनच नाही केलं तर कुस्ती या खेळाचं महत्त्व देखील दर्शवलं. अंजली आणि राणा यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा, कठीण परिस्थितीत न डगमगता, एकमेकांच्या साथीने प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची दोघांची वृत्ती प्रेक्षकांना भावली. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचे आजही तितकेच प्रेम मिळत आहे.
 

Web Title: Akshaya deodhar fan of game of thrones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.