मराठी चित्रपटसृष्टीत नवीन वर्षात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नवीन वर्षात अभिनेत्री अभिज्ञा भावे, मानसी नाईक आणि आशुतोष कुलकर्णी हे कलाकार नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यानंतर आता मराठी अभिनेत्री प्राजक्ता परब लग्नबेडीत अडकली आहे. प्राजक्ताचा अंकुश मरोदेसोबत विवाह पार पडला आहे. प्राजक्ताने तिच्या या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

अभिनेत्री प्राजक्ता परब नुकतीच अंकुश मरोदेसोबत लग्नबेडीत अडकली आहे आणि तिने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करत लिहिले की, माझ्या नवऱ्याची बायको. या दोघांचे लग्न ९ जानेवारी, २०२१ ला पार पडले. 


प्राजक्ता परबने सोशल मीडियावर तिच्या मेहंदी आणि हळदी सेरेमनीचेदेखील फोटो शेअर केले आहेत.


अभिनेत्री प्राजक्ता परबने ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, ललित २०५ या मालिकेत काम केले आहे. तसेच माझ्या मित्राची गर्लफ्रेंड वेबसीरिजमध्येदेखील ती झळकली आहे. तर अंकुश मरोदे हा लेखक आणि दिग्दर्शक आहे.


अभिज्ञा भावे, आशुतोष, मानसी नाईकनंतर आता आणखीन काही मराठी सेलिब्रेटी लग्नबेडीत अडकणार आहेत.  अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघेदेखील लवकरच लग्न करणार आहेत.

सध्या ते केळवण एन्जॉय करताना दिसत आहेत. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत या वर्षी लग्न बेडीत अडकणार आहे. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After Mansi Naik, this Marathi actress got stuck in marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.