After cab accident suyash tilak share a post with fans 'i m safe' | माणूसकी जीवंत आहे, अभिनेता सुयश टिळकने अपघातनंतर केलेली पोस्ट व्हायरल

माणूसकी जीवंत आहे, अभिनेता सुयश टिळकने अपघातनंतर केलेली पोस्ट व्हायरल

अभिनेता सुयश टिळक प्रवास करत असलेल्या गाडीचा 28 फेब्रुवारील पहाटे अपघात झाला होता. मात्र या अपघातातून सुयश सुखरुप असल्याचे त्याने सांगितले आहे. सुयश कॅबने प्रवास करत असताना हा अपघात झाला. एका मालगाडीची धडक सुशयच्या गाडीला लागली. त्यामुळे गाडी रस्तावरुन बाहेर जाऊन पलटली. सुदैवाने या अपघातात सुयश आणि गाडीच्या चालकाला कोणतीच गंभीर दुखापत झालेली नाही. गाडीचं मात्र नुकसान झाले आहे. 
 इन्स्टाग्रामवर सुयशने स्वत:चा सेल्फि शेअर करत. धन्यवाद तुम्हीही केलेल्या प्रार्थनाबद्दल आणि आर्शीवादासाठी, मी सुरक्षित आहे, देवाच्या कृपेने मला कोणतीच इजा झालेली नाही. अजूनही माणूसकी जीवंत आहे. अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर केली आहे.  

काही महिन्यांपूर्वीच सुयशने सोशल मीडियाला रामराम ठोकला होता.  बॉलिवूडच्या ‘खालीपीली’ या सिनेमात झळकला होता. सुयशने चौथीपासून अभिनय करण्यास सुरुवात केली. त्याने चौथीमध्ये असताना एक नाटक रंगभूमीवर सादर केले.

त्या दिवसांपासून ते आजपर्यंत त्याचे नाटकांविषयी असणारे प्रेम कायम असल्याचे पाहायला मिळते. ‘अमरप्रेम’ या मालिकेतून त्याला पहिला ब्रेक मिळाला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने बंध रेशमाचे, भैरोबा, नाट्यरंग, पुढचं पाऊल, दुर्वा, का रे दुरावा अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After cab accident suyash tilak share a post with fans 'i m safe'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.