Aditi Dravid's new song after 'You and Me', 'Jhilmil' | 'यु अँड मी', 'झिलमिल'नंतर आणखीन एक अदिती द्रविडचे नवीन गाणे

'यु अँड मी', 'झिलमिल'नंतर आणखीन एक अदिती द्रविडचे नवीन गाणे

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमधून ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविड उत्तम गीतकारही आहे. 'यु अँड मी' आणि 'झिलमिल' अल्बम काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले. या अल्बमला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. त्यानंतर आता ती आणखीन एक नवीन अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. याबाबतची माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.

अदितीच्या नवीन गाण्याला अवधूत गुप्तेने स्वरसाज दिला आहे. याबाबत अदितीने सोशल मीडियावर गायक अवधुत गुप्तेसोबत फोटो शेअर करून म्हटले की, 'नवीन गाणे मी लिहिले, ह्याने गायले. अवधूत दादा मी तुझी आभारी आहे. मज्जा आली.' 


अदितीचा रसिका सुनील सोबत 'यु अँड मी' हा पहिला अल्बम प्रदर्शित झाला आणि चांगला गाजलादेखील. साई–पियुष यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले होते. फुलवा खामकर हिने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले होते. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. लोणावळा येथे चित्रित झालेल्या या एका गाण्यासाठी रसिका आणि आदिती यांनी १२ वेगवेगळे ड्रेस परिधान केले होते. 
त्यानंतर तिचा झिलमिल हा अल्बम रिलीज झाला.‘झिलमिल’ अल्बमसाठी आदितीने लिहिलेले गीत बॉलीवूडचे सुप्रसिध्द संगीतकार सलीम मर्चंटने गायले. या अल्बमला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता अदितीच्या या नव्या गाण्याची तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aditi Dravid's new song after 'You and Me', 'Jhilmil'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.