Actress sonali khare did yoga in the snow | ... तिथूनच आयुष्याला सुरुवात होते, मराठमोळ्या अभिनेत्रीचा बर्फ योगातून संदेश

... तिथूनच आयुष्याला सुरुवात होते, मराठमोळ्या अभिनेत्रीचा बर्फ योगातून संदेश

 मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरेनं मालिका, चित्रपट आणि नाटक अशा प्रत्येक माध्यमात आपल्या अभिनयाच दमदार कौशल्य दाखवत मराठी इंस्ट्रीत आणि प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळ स्थान निर्माण केलंय..तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट ही नेहमीच चर्चेत असल्याचं दिसून येतं.. कलाकार मंडळी नेहमीच आपले हॅपी मुव्हमेंट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

नुकताच सोनालीनं ही शेअर केलेला एक व्हिडिओ सगळ्याचच लक्षवेधून घेतोयं . सोनालीनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बर्फात योगा करतानाचा एक हटके व्हिडिओ शेअर केलायं..जिथे तुमचा कम्फर्ट झोन संपतो, तिथूनच खऱ्या आयुष्याला सुरुवात होते' त्यामुळे सोनलीनं कॅप्शनमध्ये म्हटल्याप्रमाणं तिनं आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत काही तरी हटके करण्याचा प्रयत्न केलाये हे मात्र खरंय... सोनालीच्या या दमदार पोस्टवर पती बिजय आनंदने मजेशीर कमेंट केलीयं.. शीर्षासन करताना पडतानाचे याआधीचे व्हिडीओ तू पोस्ट केले नाहीस', अशी कमेंट करत बिजयने सोनालीची मस्करी केलीयं..त्यावर काही चाहत्यांनीही ते व्हिडीओ पाहण्यास इक्साईटेड असल्याचं म्हटलं.


 सोनालीचा नवरा बिजय आनंदने १९९८ मध्ये 'प्यार तो होना ही था' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.. या चित्रपटात त्याने काजोलच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. काही वर्षे चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेता बिजयने अभिनयातून ब्रेक घेतला आणि योगा शिकण्याकडे आपलं लक्ष वळवलं.. नंतर बिजय यांनी स्वत:चे योगा सेंटर सुरू केलंय.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress sonali khare did yoga in the snow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.