Actress shruti marathe did hot and glamorous photoshoot | मैं हूं ही नहीं इस दुनिया की.. असं म्हणत अभिनेत्री श्रुती मराठेने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट

मैं हूं ही नहीं इस दुनिया की.. असं म्हणत अभिनेत्री श्रुती मराठेने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे नेहमी आपल्या सोशल मीडियावर फोटोंमुळे चर्चेत असते. श्रुती तिचे साडीतल किंवा एथनिक लूकमधले फोटो नेहमी शेअर करत असते. मात्र यावेळी तिने हॉट अँड ग्लॅमरस फोटो शूट शेअर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. श्रुतीने यात पिवळ्या रंगाचा वनपीस घातला आहे आणि त्यावर जॅकेट घातला आहे. हे फोटो शेअर करताना श्रुतीने लिहिले, ''मैं हूं ही नहीं इस दुनिया की''. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. हे. श्रुती नेहमी आपल्या स्टायल आणि फॅशनमध्ये बदल करत असते.सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. वेळोवेळी ती तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या अभिनयाने साऊथ चित्रपटसृष्टीही गाजवत आहेत.  आपल्या अभिनयाने तिने साऊथच्या चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. 


साऊथमध्ये 'श्रुती प्रकाश' नावने प्रसिद्ध
श्रुतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. श्रुतीचा पतीदेखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress shruti marathe did hot and glamorous photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.