Actress rinku rajguru, seen in a modern look on the streets of london | लंडनच्या रस्त्यावर हटके लूकमध्ये दिसली अभिनेत्री रिंकू राजगुरु, पाहा तिचा फोटो

लंडनच्या रस्त्यावर हटके लूकमध्ये दिसली अभिनेत्री रिंकू राजगुरु, पाहा तिचा फोटो

रिंकू राजगुरु सध्या आपल्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने लंडनमध्ये शूटिंगसाठी गेली आहे. लंडनमधले फोटो ती आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते. रिंकू सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. रिंकूने लंडनच्या रस्त्यावर काढलेला फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या रिंकून फुल हाताचे टी-शर्ट, जीन्स, गळ्या भवती मफलर आणि डोक्यावर टोपी घातलेली दिसते. रिंकू या फोटोत खूपच खुश दिसतेय. रिंकूच्या चाहत्यांना तिचा मॉर्डन लूक भावला आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

छूमंतर सिनेमाच्या शूटिंग निमित्ताने रिंकू पहिल्यांदा लंडनमध्ये गेली आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि सुव्रत जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. रिंकूचे चाहतेदेखील छूमंतरबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress rinku rajguru, seen in a modern look on the streets of london

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.