ठळक मुद्देबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांने आत्महत्या केल्यानंतर हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक लोक आता आपल्या भावना व्यक्त करू लागलेले आहेत.  

 फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवोदित कलाकार जुन्या जाणकार कलाकारांचा सन्मान राखत नाहीत. अशी खंत सर्जा आणि धडाकेबाज चित्रपटाची अभिनेत्री पूजा पवार यांनी व्यक्त केली आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी  पूजा यांची ही पोस्ट फेसबुक टाकली. या पोस्टमध्ये पूजा यांनी अभिनेता शशांक केतकरबद्दलचा अनुभव लिहिला होता. आता शशांकने पूजा यांच्या पोस्टवर उत्तर दिले असून दिलगिरी व्यक्त केली आहे.

काय म्हणाल्या होत्या पूजा पवार?

 एका मालिकेत मी शशांक केतकर याच्या आईची भूमिका केली होती,  त्या नंतर एकदा मी शशांक चे नाटक पाहायला गेले होते तेव्हा मी स्वत: हुन बोलायला गेले तर त्याने  आपल्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत बोलायचे टाळले होते. या गोष्टीचे आपल्याला खूप वाईट वाटल्याचे पूजा पवार यांनी  पोस्ट केलेल्या म्हटले होते.

शशांकची दिलगीरी
आता शशांकने पूजा यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत, दिलगिरी व्यक्त केली आहे.
पूजा पवार यांच्याकडे पाहून मी दुर्लक्ष केले असेलही. पण ते जाणूनबुजून केले नसावे. माझ्याकडून असे काही घडले असेल तर मी मनापासून माफी मागतो. पूजा ताई नाटकाला आली होती आणि मी बोललोही होतो, असे मला तरी आठवतेय. असो, मोठ्यांचा आदर करण्याबद्दल बोलाल तर मला व्यक्तिश: ओळखतात ते माझ्या मागेही सांगतील की मी तसा  नाही़. नाटकाला आलेला अगदी शेवटचा प्रेक्षक भेटून बाहेर पडल्याशिवाय मी थिएटरमधून बाहेर पडत नाही. तरीही मी पूजा ताईना स्वत: फोन करून घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त करेन. कमेंट करणा-या सर्वांना एकच विनंती आहे की, पर्सनली एखाद्याला ओळखत नसाल तर नुसत्या ऐकीव गोष्टीवरून त्या व्यक्तिचे संस्कार, पैसा, त्याची लायकी याबदद्ल बोलून मोकळे होऊ नका. मी माझी प्रामाणिक प्रतिक्रिया दिली. यापेक्षा अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, असे मी समजतो, असे शशांकने म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांने आत्महत्या केल्यानंतर हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक लोक आता आपल्या भावना व्यक्त करू लागलेले आहेत.  त्यातूनच जुन्या जाणकार आणि नवोदित कलाकारांची कशी घुसमट होत आहे हे आता हळूहळू बाहेर येत आहे. पूजा पवार यांना यांनीही या भावनेतून पोस्ट केली होती. महेश टिळेकर यांनी त्यांची ही पोस्ट शेअर केली होती. मात्र आता शशांकच्या दिलगीरीनंतर त्यांनी ही पोस्ट आपल्या फेसबुक पेजवरून काढून टाकली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: actress pooja pawar post and shashank ketkar apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.