सोशल मीडियावर सेलिब्रिटी मंडळी बरीच ऍक्टिव्ह असतात. आपापल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, आगामी सिनेमा, त्यांचे ट्रेलर, पोस्टर याची प्रत्येक गोष्ट ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट फॅन्सशी संवाद साधता येत असल्याने दिवसेंदिवस अधिकाधिक सेलिब्रिटी इथं रुळल्याचं पाहायला मिळते. या माध्यमातून रसिकांच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेता येत असल्याने रसिक सोशल मीडियाला प्राधान्य देत आहेत. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे नेहा पेंडसे.


आपल्या फॅन्सशी ती कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असते. आपले आगामी सिनेमा आणि त्याची माहिती फॅन्ससह शेअर करत असते. शिवाय आपल्या फॅन्ससह काही चांगले विचारही शेअर करत असते. नुकतंच नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. शेअर केलेल्या मॉर्निंग सेल्फीमध्ये नेही निवांत दिसत आहे. चेहऱ्यावर हास्य आणि हाच निवांत क्षण तिने कॅमे-यात कॅप्चर केला आहे. या फोटोतही नेहा नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसत असून तिच्या या फोटोवर तिला खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत. हा फोटो पाहून नेटीझन्सनाही सकारात्मक विचार करा, सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक जीवन जगण्याची जणून प्रेरणा देणारा असाच आहे. 


नेहा शार्दुलसह नात्यात असून तिने स्वतः ही गुड न्युज चाहत्यांसह शेअर केल होती. अद्यापतरी तिच्या लग्नाची तारिख ठरलेली नसून योग्य वेळेवर नेहा लग्नाच्या सगळ्या गोष्टी चाहत्यांसह शेअर करणार असल्याचे तिने दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Neha Pendse is getting such comments, after photos of her before marriage were found in his bedroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.