अनेक अभिनेत्रींनी आपल्या लग्नाची बातमी मीडियापासून लपवलेली अशी अनेक उदाहरणं आहेत. यांत आता आणखीन एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. लग्नाची बातमी तिने सा-यांपासून लपवण्याचे नेमकं कारण समजले नसले तरी सध्या ही अभिनेत्री कुठे आणि काय करते याविषयीही चर्चा होत असतात. पक पक पकाक सिनेमातून मराठी रसिकांच्या भेटीला आलेलीही अभिनेत्री आहे नारायणी शास्त्री. 

२०१५ साली तिने फॉरेनर बॉयफ्रेंड स्टीवन सोबत गुपचूप लग्न करत संसारात रमली. मुळात तिला लग्नाची बातमी जगजाहीर करायची नव्हती. माझ्या लग्नाची चर्चा का व्हावी. लग्नामुळे मिळणारी पब्लिसिटी टाळायची होती.

लग्न  हा माझा खाजगी विषय आहे असे तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.  नारायणी  “क्युंकी सांस भी कभी बहू थी” मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. 'कुसुम', 'पिया का घर', 'नमक हराम', 'रिश्तों का चक्रव्यूह', 'फिर सुबह होगी', 'लाल इश्क' अशा अनेक टीव्ही मालिकेतून रसिकांचे मनोरंजन केले आहे. 


विशेष म्हणजे तिच्या प्रोफेशनल करिअरपेक्षा खाजगी आयुष्यावरच जास्त चर्चा रंगली. तिचे खाजगी आयुष्य अनेकदा वादाच्या विळख्यात अडकलेले पाहायला मिळाले. अनुज सक्सेना या बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिचा को-स्टार असलेल्या गौरव चोप्रा सोबत तिचे नाव जोडले गेले होते. गौरव चोप्रा आणि नारायणी शास्त्री या दोघांनी 'पिया का घर', 'घर घर की लक्ष्मी','बेटीयाँ' सारख्या मालिकेत काम केले. मालिकेच्या सेटवरच त्यांच्या मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे प्रेमात रूंपातर झाले. मात्र फार काळ त्यांचे हे नाते टीकले नाही.

 

नारायणीला स्मोकिंगची सवय होती आणि हीच गोष्ट  गौरवला पसंत नव्हती अनेकदा नारायणीला गौरवने स्मोकिंग करण्यापासून रोखले होते. मात्र तरीही नारायणीचे स्मोकींग सुरू असल्याचे पाहून गौरव चोप्राने तिच्यापासून दूर राहणे पसंत केले होते.

Web Title: Actress Narayani Shastri tied knot Secretly, Hide her wedding details because of this Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.