ज्या कलाकारांना पाहत आपण मोठं झालो, ज्या कलाकारांनी अभिनयात वेगळी उंची गाठलीय, ज्यांच्या अभिनयाचा आणि नावाचा डंका चित्रपटसृष्टीत गाजतो अशा कलाकारांसह काम करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यांच्यासोबत काम करता आलं नाही तरी त्यांच्याकडून कामाचं कौतुक व्हावं असंही प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. असंच एक स्वप्न मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचंही प्रत्यक्षात अवतरलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मृण्मयीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये बॉलीवूडच्या दिवा आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा पाहायला मिळत आहे. रेखा आणि मृण्मयी दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. रेखा यांनी मृण्मयीच्या गालावर पापा घेत तिचं कौतुक केलं आहे. रेखा यांच्या या प्रेमामुळे मृण्मयी भारावून गेली आहे.

 

हाच खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री मृण्मयीकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत. तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. विशेष म्हणजे तिची फर्जद सिनेमातील भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती.

या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती. मृण्मयीने त्यासाठी १५ दिवस दररोज चार तास तलवारबाजीचा सराव केला होता. याशिवाय कट्यार काळजात घुसली' , नटसम्राट, 'स्लॅमबुक' चित्रपटात मृण्मयीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. विविध सिनेमातील अभिनयासह मृण्मयीने दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.

 


Web Title: Actress Mrunmayee deshpande Appriciated by Bollywood Diva Rekha
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.