अभिनेत्री मयुरी वाघ सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. याच कारणही तसे खासच आहे कारण ती  परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मयुरी सध्या थायलंड येथे क्वॉलिटी टाइम एन्जॉय करत आहे. तिने थायलंडमधील क्राबी येथील आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे सध्या खूप व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये मयुरी कधी बीचवर तर समुद्रात मस्ती करताना दिसत आहे. त्याबरोबरच विशेष म्हणजे फॅमिली सोबत ती या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. प्रत्येक क्षण मयुरी कॅमेऱ्यात कैद करत आहे. 


मयुरीचे  हे फोटो चाहत्यांना एवढे आवडले की, खूप कमी वेळेत फोटोंना खूप चांगले लाइक्स मिळाले आहेत, तसेच फॅन्स मयुरीच खूप कौतुकही करत आहेत. हे फोटोज शेअर करत मयुरीने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. यापूर्वीही तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर ती शेअर करत असते. तिचे फोटो खूप व्हायरलही होत असतात.  ज्यामध्ये ती समुद्रात मस्ती करतान दिसत आहे. लवकरच मयुरी वाघ तिचा बर्थ डे ही सेलिब्रेट करणार आहे. मयुरी तिचे व्यावसायिक आणि खाजगी जीवन अगदी  चांगल्यारितीने बॅलन्स करते. मयुरीने अभिनेता पियुष रानडेसह लग्न केले आहे. 


मयुरी वाघ आणि पियुष रानडे या दोघांची लव्हस्टोरी 'अस्मिता' मालिकेच्या सेटवरच सुरू झाली होती.इतकेच नाहीतर ही जोडी रसिकांना इतकी आवडली की या जोडीने लग्न करावे अशा आग्रहाचे मॅसेजेस-पत्रे या दोघांना येऊ लागले. कालांतराने सोबत काम करता करता हे दोघे खरच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Actress Mayuri Wagh Enjoying vacation In Thailand , See Her Exclusive photo !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.