कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरातून ऐकायला मिळत असतील. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे छोट्या पडद्यावरील नंदिता वहिनी या व्यक्तीरेखेमुळे प्रसिद्ध झालेली  अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. पतीच्या वाढदिवसाच्याच दिवशी तिने तिची गुड न्युज शेअर करताच चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला.

सध्या धनश्री तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. इतरांप्रमाणे तिनेही मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. तिने परिधान केलेला ड्रेसही तितकाच आकर्षक असा होता.फोटोशूटमधील निवडक फोटो तिने शेअर केले होते.

 

या फोटोंनाही चाहते लाकईक्स आणि कमेंटस देत असल्याचे पाहायला मिळाले. प्रेग्नंसीमुळे तिच्या चेह-यावर कमालीचे तेज आल्याचे पाहायला मिळत आहे. बाळाच्या आगमनाची हे कुटुंबीय आतुरतेने वाट पाहात आहेत.

धनश्री सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.  नुकतंच तिच्या घरी एक कार्यक्रम पार पडला. त्याचा फोटो तिने सोशल मीडियावरही शेअर केला आहे. हा फोटो पाहताच डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा होता हे तिच्या फॅन्सनी लगेच ओळखलं.

 

या फोटोत तिने नकात नथ, कपाळावर हळद कुंकू आणि डोक्याला फुलांचा गजरा बांधल्याचं दिसत आहे. त्यामुळे अशाप्रकारे साजश्रृंगार हा डोहाळे जेवण कार्यक्रमाचा थाट पाहून चाहत्यांमी तिच्या या आनंदात सहभागी होती अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरूवात केलीय. 

धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले होते. धनश्रीला 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती 'गंध फुलांचा गेला सांगून', 'जन्मगाठ' या मालिकांमध्ये झळकली.

विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. 'झोपी गेलेला जागा झाला' आणि 'आधी बसू मग बोलू' या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे.दासबाबू दिग्दर्शित 'ब्रेव्हहार्ट' या चित्रपटातून धनश्रीची मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली आहे. याचवर्षी रिलीज झालेल्या या चित्रपटात अभिनेता संग्राम समेळसोबत धनश्री झळकली होती. शिवाय तिचा 'चिठ्ठी' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Dhanashri Kadgaonkar very soon enjoy motherhood, celebrated dohale jevan function

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.