वाजले की बारा म्हणत अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी रसिकांना अक्षरक्षा वेड लावले. मराठी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृता सध्या पती हिमांशुचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वैष्णो देवीला गेली आहे. हिमांशुने त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. इंडस्ट्रीत अमृता आणि हिमांशू यांच्याकडे परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते. 

इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज या शोच्या सेटवरच अमृता व हिमांशू एकमेकांना भेटले होते.  हिमांशू पंजाबी आहे तर अमृता मराठी. दोघांचेही एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम आहे. अमृताचा पती हिमांशू मल्होत्रा हा हिंदी मालिकांमध्ये काम करतो.  पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शोनच बलियेचे विजेतेपदसुद्धा पटकावलं होते. 24 जानेवारी 2015 रोजी अमृताने हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाआधी जवळजवळ 9 वर्षे अमृता व हिमांशू रिलेशनशिपमध्ये होते. 

सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.  मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच अमृता पुष्कर जोगसोबत 'वेल डन बेबी'या सिनेमात दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress amrita khanwilkar arrives here to celebrate her husband himanshu malhotra's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.