पाहा कुठे भटकंती करतेय रसिकांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर, असे करते एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:14 AM2019-11-21T11:14:59+5:302019-11-21T11:15:18+5:30

शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ती आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असते.

Actress Amrita Khanvilkar Posts selfie from Eiffel Tower | पाहा कुठे भटकंती करतेय रसिकांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर, असे करते एन्जॉय

पाहा कुठे भटकंती करतेय रसिकांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर, असे करते एन्जॉय

googlenewsNext

 सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अमृताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. तसेच  आपले  खास फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. नुकतंच तिने शेअर केलेला एक फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरतोय.

अमृताचा हा सेल्फी तसा खासच आहे. कारण पॅरिसमधील आयफिल टॉवर समोरल तिने  काढलेला सेल्फी तिच्या फॅन्सना भावतो आहे. अमृताने आयफिल टॉवर समोर  सेल्फी काढल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. अभिनयासोबतच तिला भटकंतीची फार आवड आहे. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ती आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असते.  

 

यावेळी तिने अनेक फोटोज तिच्या इन्सटाग्रामवर शेअर केले आहेत. आयफिल टॉवरसह  वेगवेगळ्या ठिकाणांनाही तिने भेट दिली. या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

Web Title: Actress Amrita Khanvilkar Posts selfie from Eiffel Tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.