Abhijeet Khandkekar will be seen in Sanjay Dutt's Marathi Movie Baba | झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील 'हा' अभिनेता दिसणार संजय दत्तच्या सिनेमात
झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील 'हा' अभिनेता दिसणार संजय दत्तच्या सिनेमात

संजय दत्तने गेल्या अनेक वर्षांत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यानंतर आता तो मराठी चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. तो मराठी सिनेमात अभिनय करताना दिसणार नाहीये तर तो चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचे नाव बाबा असं आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. या चित्रपटात झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायकोमधील गुरूनाथ म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. त्यानेच ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. 


अभिजीतने इंस्टाग्रामवर बाबा चित्रपटाचे पोस्टर शेअर करून तो या चित्रपटात काम करत असल्याचे सांगितले आहे.

संजय दत्तने नुकतेच एक ट्वीट करून त्यात लिहिले आहे की, माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव बाबा असून हा चित्रपट मी माझ्या वडिलांना समर्पित करत आहे. ते संपूर्ण आयुष्यभर माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. 

या चित्रपटाची निर्मिती संजय दत्त प्रोडक्शच्या अंतर्गत केली गेली असून या चित्रपटाची निर्माती संजयची पत्नी मान्यता दत्त आणि अशोक सुभेदार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले असून ट्विटरद्वारे संजयने या चित्रपटाचे पोस्टर देखील लाँच केले आहे.

या चित्रपटाच्या पोस्टवरवर एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत सायकलवर बसलेला दिसून येत आहे. भावनेला भाषा नसते अशी या चित्रपटाची टॅगलाईन असून हा चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
 

Web Title: Abhijeet Khandkekar will be seen in Sanjay Dutt's Marathi Movie Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.