शिंदेंच्या मंत्रिमंडळात असलेले, पण नव्या मंत्रिमंडळात नसलेले 'ते' १२ नेते कोण? पहा यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 21:01 IST2024-12-15T21:00:27+5:302024-12-15T21:01:47+5:30
महायुती सरकारने नव्या मंत्रिमंडळात अनेक जुन्या मंत्र्यांना संधी दिली जाणार नाही, अशी चर्चा होती. ती खरी ठरली आहे.

शिंदेंच्या मंत्रिमंडळात असलेले, पण नव्या मंत्रिमंडळात नसलेले 'ते' १२ नेते कोण? पहा यादी
Maharashtra Breaking News: हिवाळी अधिवेशन होण्यापूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. काही जुन्या, काही मागच्या सरकारमध्ये संधी न मिळालेल्या आणि काही नवीन चेहऱ्यांना महायुतीने मंत्रिमंडळात संधी दिली. दुसरीकडे मागच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेक नेत्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षानी आपापल्या पक्षातील काही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता नवीन आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कॅबिनेट मंत्री असलेले १२ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नाहीत. भाजपने सुधीर मुनगंटीवार, रविंद्र चव्हाण, विजयकुमार गावित आणि सुरेश खाडे यांना संधी दिली नाही. त्याऐवजी काही वरिष्ठ, नवीन आमदारांना संधी दिली आहे.
या नेत्यांना मंत्रिमंडळात मिळू शकले नाही स्थान
दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस), अनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), संजय बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस), धर्मराव आत्राम (राष्ट्रवादी काँग्रेस), सुधीर मुनगंटीवार (भाजप), विजयकुमार गावित (भाजप), सुरेश खाडे (भाजप), तानाजी सावंत (शिवसेना), रविंद्र चव्हाण (शिवसेना), अब्दुल सत्तार (शिवसेना), दीपक केसरकर (शिवसेना).
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात हे आहेत मंत्री
- चंद्रशेखर बावनकुळे
- राधाकृष्ण विखे पाटील
- हसन मुश्रीफ
- चंद्रकांत पाटील
- गिरीश महाजन
- गुलाबराव पाटील
- गणेश नाईक
- दादाजी भुसे
- संजय राठोड
- धनंजय मुंडे
- मंगलप्रभात लोढा
- उदय सामंत
- जयकुमार रावल
- पंकजा मुंडे
- अतुल सावे
- अशोक ऊईके
- शंभुराज देसाई
- आशीष शेलार
- दत्तात्रय भरणे
- अदिती तटकरे
- शिवेंद्रसिंह राजे भोसले
- माणिकराव कोकाटे
- जयकुमार गोरे
- नरहरी झिरवळ
- संजय सावकारे
- संजय शिरसाट
- प्रताप सरनाईक
- भरत गोगावले
- मकरंद पाटील
- नितेश राणे
- आकाश फुंडकर
- बाबासाहेब पाटील
- प्रकाश आबिटकर
राज्यमंत्री
- माधुरी मिसाळ
- आशीष जायस्वाल
- पंकज भोयर
- मेघना बोर्डीकर
- इंद्रनील नाईक
-योगेश कदम