Uddhav Thackeray Devendra Fadnavis: "मी देवेंद्र फडणवीसांचा जाण्या-येण्याचा, हॉटेलचा खर्च करतो, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंचे उपमुख्यमंत्र्यांना 'चॅलेंज'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 11:47 AM2024-03-31T11:47:40+5:302024-03-31T11:49:06+5:30

Uddhav Thackeray Challenge Devendra Fadnavis: राहुल गांधी यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली होती. त्या टीकेला उद्धव ठाकरेंनी टोला लगावता प्रत्युत्तर दिले.

Uddhav Thackeray slams Devendra Fadnavis gives challenge to visit Manipur also agrees to bear complete tour expenses | Uddhav Thackeray Devendra Fadnavis: "मी देवेंद्र फडणवीसांचा जाण्या-येण्याचा, हॉटेलचा खर्च करतो, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंचे उपमुख्यमंत्र्यांना 'चॅलेंज'

Uddhav Thackeray Devendra Fadnavis: "मी देवेंद्र फडणवीसांचा जाण्या-येण्याचा, हॉटेलचा खर्च करतो, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंचे उपमुख्यमंत्र्यांना 'चॅलेंज'

Uddhav Thackeray Challenge Devendra Fadnavis: राज्यात सध्या लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराचा माहोल आहे. प्रत्येक पक्ष प्रचारात आपली कशी सरशी होइल याकडे लक्ष देताना दिसतोय. त्यामुळेच प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर आरोप करणे किंवा त्यांना टोलेबाजी करण्यात कोणीही मागे पडताना दिसत नाही. नुकताच स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट प्रदर्शित झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवासांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर राहुल गांधी टोला लगावला होता. 'सावरकरांवर सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनी हा चित्रपट पाहावा, त्यांच्यासाठी थिएटर बूक करण्याचा खर्च मी करतो', असा खोचक टोला त्यांनी लगावला होता. त्याबाबत प्रश्न विचारताच, शिवसेना उबाठा पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांनी टोला लगावला.

"मी देवेंद्र फडणवीसांचा पूर्ण जाण्याचा येण्याचा खर्च करतो, त्यांचा हॉटेलचा खर्च करतो त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावे. त्यांनी लडाखमध्येही जाऊन यावे. मी खर्च करायला तयार आहे. दार्जिलिंगमध्ये एका व्यक्तीला दिलेली वचनं कशी मोडली ते भेटून माहिती घ्यावी. अरूणाचलमध्ये जाऊन यावं. त्यांच्या जाण्या-येण्याचा आणि राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे. काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं. बॉलीवुडची मंडळी आता राजकारणात येत आहेत. तर एखाद्या निर्मात्याला सोबत घेऊन फडणवीसांनी मणिपूर फाइल्स हा चित्रपट काढावा," अशी खोचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

Web Title: Uddhav Thackeray slams Devendra Fadnavis gives challenge to visit Manipur also agrees to bear complete tour expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.