...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 06:28 IST2024-05-11T06:27:26+5:302024-05-11T06:28:10+5:30

लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांना साथ नाही; शरद पवार यांनी धुडकावला मोदींचा सल्ला

...'that' is child mind; Criticizing Ajit Pawar, Sharad Pawar blasted Modi's advice | ...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला

...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी सन्मानाने अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन व्हावे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धुडकावला. लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत कधीही जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.    

पुण्यात खेळाडूंच्या समस्या जाणून घेतल्यानंतर पवार म्हणाले, हा देश एक ठेवायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन जावे लागेल. पंतप्रधान केवळ एका धर्माबाबत वेगळी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे देशात ऐक्य राहणार नाही. मोदी अस्वस्थ झाले आहेत, त्यातूनच ते अशी विधाने करत आहेत. 

शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे सुतोवाच केले होते, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावरून शरद पवार त्यांचे नाव न घेता म्हणाले,  राजकारणात बालबुद्धी असलेले अनेक लोक असतात. याच बालबुद्धीने ते बोलत असतात.  

Web Title: ...'that' is child mind; Criticizing Ajit Pawar, Sharad Pawar blasted Modi's advice